वार्ताहर
रसायनी : रसायनी पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून त्या संदर्भात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक ३० जून २०२५ रोजी सुभाष लिंबाजी कुंभेफळकर (वय ४३) हे आपल्या घरातील सदस्यांना “गावी जातो” असे सांगून निघून गेले, परंतु अद्यापही ते त्यांच्या मूळ गावात पोहोचलेले नाहीत. याबाबत त्यांची पत्नी ज्योती सुभाष कुंभेफळकर (वय ३८) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक २३/२०२५ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. सदरील व्यक्तीचे मूळ गाव आंबेजोगाई, जि. बीड असून ते सध्या गोकुळ नगरी सोसायटी, रिस, ता. खालापूर येथे वास्तव्यास होते.
रसायनी पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सुभाष कुंभेफळकर यांना कोठेही पाहिले असल्यास किंवा त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास, खालील क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा:
📌 प्रभारी अधिकारी श्री. संजय बांगर: ९०१११२९९९४
📌 हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील: ९५२७१७३२७३ / ९४७०८५५२३४
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस विभाग संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाने केली आहे.
