विश्वास निकम
कोलाड : सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:२५ वाजता आंबेवाडीमधील गणेश नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. गजानन लक्ष्मण जंगम (वय ४८), रा. आंबेवाडी, हे कालव्यासमोरील पाण्यात तोल जाऊन पडल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली. मदतीसाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या साहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
पुढील तपास पोलीस हवालदार आंबेतकर हे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
