• Sat. Jul 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

ByEditor

Jul 19, 2025

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड

रायगड, दि.19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व पेण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 22 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भाऊसाहेब नेणे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पेण ता. पेण येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login याक्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. व तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनामध्ये इंटर्शिपला अप्लाय करण्यासाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिककरुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहीती अद्ययावत करुन Apply for Jobs ला क्लिककरुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्तपदांना Apply करावा.

रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!