• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चौल दादरचा १२ वर्षीय गंधार अखेर सुखरूप; मुरुडजवळ सापडल्याने पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास!

ByEditor

Feb 16, 2026

रेवदंडा । सचिन मयेकर
रायगड जिल्ह्यातील चौल दादर परिसरातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय विद्यार्थी अखेर सुरक्षित सापडल्याने पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गंधार उत्तम परिट (वय १२) असे या मुलाचे नाव असून, तो मुरुडजवळ सायकलवरून जात असताना आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गंधार हा जिल्हा परिषद शाळा चौल दादर येथून अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. ही माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. सोशल मीडिया आणि वैयक्तिक संपर्काद्वारे मुलाचे वर्णन सर्वत्र पोहोचवण्यात आले होते.

शोधमोहीम सुरू असतानाच, हा मुलगा मुरुडच्या दिशेला सायकलवरून जात असल्याची माहिती समोर आली. शोध पथकाने तातडीने हालचाली करून त्याला ताब्यात घेतले. सुदैवाने, तो पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

मुलगा सुखरूप सापडल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आणि मदतीला धावून आलेल्या नागरिकांचे आभार मानले आहेत. दरम्यान, “पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे आणि अशा घटना टाळण्यासाठी मुलांशी संवाद साधून सतर्क राहावे,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!