• Sun. Jul 20th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“मी काही पाप केले नाही, जाहिराती स्कीप करत होतो”, जंगली रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा

ByEditor

Jul 20, 2025

मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधिमंडळात जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे यांनी या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले असून त्यांनी सर्व प्रकरणाला “जाहिरात स्किप करताना निर्माण झालेली अडचण” असे संबोधले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर उत्तर देताना चांगलाच दम लागल्याचे दिसून आले.

कोकाटे यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललय पाहण्यासाठी youtube प्ले करत होतो. मात्र युट्युब प्ले करत असतानाच जाहिरात आली, ती जाहिरात स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमी जाहिरात येत नाही का? असा उलट सवाल कोकाटे यांनी केला. कोकाटे यांनी आपला बचाव करताना मी काही पाप केलं नसल्याचे म्हणाले ते म्हणाले. मी जाहिराती स्किप करत होतो त्यामध्ये दोन-तीन सेकंद लागले ते त्यांना दाखवायचं नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेला कामावरती ते बोलत नाहीत. माझं काम पारदर्शकपणे असल्याने मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू असं सावरासारव माणिकराव कोकाटे यांनी केली. ते म्हणाले की माझ्या काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या सेकंदाला मी जाहिरात स्कीप केली. मात्र तेवढाच व्हिडिओ दाखवून टार्गेट करण्यात आल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.

कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना स्पष्ट केलं की, “आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे. आम्ही दौरे करत आहोत, काम करत आहोत. लोकांना बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात आहेत.” त्यांनी रोहित पवार यांच्यावर टोलाही लगावला की, “त्याच्या मोबाईलवरही अशा जाहिराती येतात, त्याचा वापर तो स्वतःच्या करमणुकीसाठी करतो.”

भाजपला विचारूनच काम करावं लागतं या टीकेसंदर्भात कोकाटे म्हणाले, “कारण नसताना टार्गेट केलं जात आहे. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.” मीडिया या प्रकरणाला अतिशयोक्तीपणे दाखवत असल्याचं त्यांनी सूचित केलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह हे चार मंत्र्यांना डच्चू देण्याच्या विचारात असल्याचं दावा केलं असून त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचंही नाव असल्याचं म्हटलं आहे. याबाबत कोकाटे म्हणाले, “त्या राऊतांना माहिती असेल, मला काही माहिती नाही.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!