रायगड जनोदय ऑनलाईन
आपण रात्री उरलेलं अन्न हे खराब होऊ नये म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवतो. प्रत्येक घरात असचं चित्र पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये अन्न ठेवून ते पुन्हा खाणे हे खूप सामान्य आहे. बऱ्याच घरांमध्ये, जर जास्त अन्न शिल्लक राहिले तर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते. तर कधी कधी वेळेअभावी लोक दिवसभराचे अन्न एकदा शिजवतात आणि ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर ते हळूहळू खातात. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाण्याचे कारण काहीही असो.मात्र त्याबाबत काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. अन्यथा आजारी पडण्यास वेळ येईल. उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही अन्नाची जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ले तर या छोट्या चुका अजिबात करू नका. नाहीतर त्याचा परिणाम शरीरावर देखील होण्यास सुरुवात होईल.
फ्रिजमध्ये अन्न ठेवताना कोणती काळजी घ्यावी?
अन्न थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवा : गरम अन्न कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. जेव्हा गरम अन्न फ्रिजच्या थंड तापमानात ठेवले जाते तेव्हा दोन्हीच्या तापमानात खूप फरक असतो आणि त्यामुळे अन्नाची चव खराब होते.
शिजवलेले अन्न दोन तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा : जर तुम्ही अन्न शिजवले असेल तर ते थंड करा आणि दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवा. अन्न थंड झाल्यानंतर त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ लागते. म्हणून जर अन्न दोन तास खोलीच्या तपमानावर ठेवले तर ते खराब होऊ लागते. म्हणून, ते दोन तासांच्या आत फ्रिजच्या थंड तापमानात ठेवा.
फक्त एकदाच गरम करा : फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न फक्त एकदाच गरम करा. जर फ्रिजमध्ये जास्त प्रमाणात अन्न असेल तर आवश्यक तेवढे बाहेर काढून गरम करा आणि उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवा. एकदा गरम झाल्यावर ते पुन्हा फ्रिजमध्ये ठेवले तर त्याचे पोषण नष्ट होऊ लागते.
अन्न पुन्हा फ्रिजमध्ये ठेवू नका : जर तुम्ही शिजवलेले अन्न रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढले असेल आणि ते खोलीच्या तापमानात आल्यानंतर ते परत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका कारण अशा अन्नात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि नंतर ते खराब होते.
उघडे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका : जर तुम्ही फ्रिजमध्ये उघडे अन्न ठेवले तर इतर अन्नांवर आणि फ्रिजमध्ये बॅक्टेरिया राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्न खराब होते.
रेफ्रिजरेटरचे तापमान तपासा : जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले अन्न खबरदारी घेतल्यानंतरही खराब होत असेल, तर रेफ्रिजरेटरचे तापमान तपासा. रेफ्रिजरेटरचे तापमान किमान 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असावे. तर अन्न खराब होणार नाही.