• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोयनाड कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल ठरले ‘चॅम्पियन’

ByEditor

Jul 21, 2025

क्रीडा प्रतिनिधी
पोयनाड :
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय, पोयनाड येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९ व २० जुलै रोजी “कॅरम दिन” साजरा करत जिल्हास्तरीय पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत कामोठे येथील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू राजेश गोहिल यांनी अंतिम विजय संपादन करत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत त्यांनी सचिन नाईक यांचा पराभव केला. विजेत्या गोहिल यांना रोख रु. ७,०००/- आणि झुंझारचे माजी अध्यक्ष कै. अन्वर बुराण स्मृतीचषक प्रदान करण्यात आला.

उपविजेता सचिन नाईक (पनवेल) यांना रोख रु. ५,०००/- व चषक, तर तृतीय क्रमांक देवेन सिनकर (अलिबाग) यांनी पटकावला, त्यांना रु. २,५००/- व चषक देण्यात आला. चतुर्थ क्रमांक श्याम घायवत यांना देखील रु. २,५००/- व चषकाने सन्मानित करण्यात आले.

पाचव्या ते आठव्या क्रमांकाचे विजेते:

५वा: सुरेश बीस्त

६वा: निखिल कोशिमकर

७वा: अभिजित तुळपुळे

८वा: आशिष देशमाने

या सर्वांना प्रत्येकी रु. १,०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले. ९ ते १६ क्रमांकावरील खेळाडूंना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १६८ कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व विभागांतील खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे, सचिव दिपक साळवी, सहसचिव अभिजित तुळपुळे, मनोहर पाटील, झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, तहसीन बुराण, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर, योगेश चवरकर, सुजित साळवी, ॲड. पंकज पंडित, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य भरतशेठ जैन, माजी सरपंच भूषण चवरकर (पोयनाड), शैलेश पाटील (आंबेपुर), स्वप्नील पाटील (शहापूर), राजेंद्र जाधव, चेतन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कॅरम प्रेमी आणि खेळाडूंच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!