घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुधीर बबन चव्हाण यांना “ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने राज्यभरातून ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सुधीर चव्हाण यांनी पोलादपूर तालुक्यातील लोहरे गावासाठी केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार शनिवार, दि. १९ जुलै रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सुधीर चव्हाण यांच्या या यशामुळे उरण तालुक्यातील ग्रामविकास विभागात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामविकासात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या चव्हाण यांची ही कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
