अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा माजी सरपंच कै. सुरेश वेलणकर यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश वेलणकर (वय ६१) यांचे शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शांत, हसतमुख व मितभाषी स्वभावाच्या प्रतिभा वेलणकर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व मोठा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार रविवार, दि. २० जुलै रोजी सकाळी ८:३० वाजता चोंढी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडले.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक, धार्मिक व स्थानिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये रघुजीराजे आंग्रे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, माजी समाजकल्याण सभापती दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, जगनआप्पा पेढवी, रवीनाना ठाकूर, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, शेकापचे संदीप गायकवाड, सत्यजित दळी, डॉ. कोतेकर, नितीन राऊत, उद्योजक राजू शिंदे, जयेश शिंदे, ऍड. जयेश जोशी, पोलीस पाटील प्रीती गायकवाड, जय हनुमान ट्रस्ट व सुखदा महिला मंडळ चोंढीचे पदाधिकारी, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. २८ जुलै रोजी व उत्तरकार्य गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे. यावेळी मामांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीकडून दुखवटा स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
