प्रतिनिधी
अलिबाग : “स्वच्छ किनारा, निरोगी उद्याचा आधार” या ब्रीदवाक्याला अनुसरून अलिबाग नगरपरिषदेतर्फे २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता अलिबाग बिचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसह नागरिकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करणे.
ही मोहीम केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता के दो रंग, सफाईमित्र सुरक्षा, तसेच LIFE (Lifestyle for Environment) या राष्ट्रीय अभियानाशी सुसंगत आहे. “सफाई अपनाओ, बिमारी भागाओ” या घोषवाक्याच्या माध्यमातून रोगमुक्त समाजासाठी स्वच्छता हाच मूलमंत्र असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
या उपक्रमात माणुसकी फाउंडेशन, तेजस्विनी महिला मंडळ, पनवेल एज्युकेशन ट्रस्ट, कल्याणी फाउंडेशन, PNP कॉलेज, आणि विविध सामाजिक संस्था व विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत.
नागरिकांना खुले आवाहन
नगरपरिषदेने अलिबागवासीयांना आणि पर्यटकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समुद्रकिनाऱ्यांची निगा राखणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेशही यामागे आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
- दिनांक: २६ जुलै २०२५ (शनिवार)
- वेळ: सकाळी ८.०० वाजता
- स्थळ: अलिबाग बिच
