खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात बोरघाटात दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्यात गेल्या दोन दिवसापांसून जोरदार पाऊस होत आहे. रायगड जिल्ह्यातही दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठीकाणी दरडी कोसळत आहेत. दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ डोंगरावरील माती व काही झाडेझुडपे रस्त्यावर आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस व आयआरबी यंत्रणा यांनी घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर आलेली माती व झाडे बाजूला काढण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे.