अलिबाग : करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेनंतर झालेल्या शोधमोहीमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. बोटीवरील आठ जणांपैकी पाच जण पोहत सासवणे किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, तीन मच्छिमार बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सासवणे किनाऱ्यावर, दुसऱ्याचा किहीम किनाऱ्यावर आणि तिसऱ्याचा मृतदेह दिघोडे किनाऱ्यावर आढळून आले आहेत. या दुर्घटनेतील सर्व बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह मिळाले असून पुढील कार्यवाही पोलीस विभागामार्फत सुरू आहे.
