रायगड, दि. ३०: जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मक दृष्ट्या धोकादायक स्थितीत आढळल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.
Vijna Consulting Engineers Pvt. Ltd. या संस्थेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार, अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे आणि भाकरवड-देहेन मार्गांवरील एकूण ८ पूल अत्यल्प भार क्षमता (५ ते १६ टन) असलेले असून ते धोकादायक स्थितीत आहेत.
बंद करण्यात आलेले पूल व त्यांची भार क्षमता:
| क्र. | पुलाचे नाव / क्रमांक | रस्ता | भार क्षमता |
|---|---|---|---|
| 1 | रामराज पुल (20/340) | अलिबाग-रोहा रा.मा. 91 | 5 टन |
| 2 | स्लॅब कलवर्ट (21/680) | अलिबाग-रोहा रा.मा. 91 | 5 टन |
| 3 | स्लॅब कलवर्ट (22/250) | अलिबाग-रोहा रा.मा. 91 | 5 टन |
| 4 | सुडकोली पुल (26/260) | अलिबाग-रोहा रा.मा. 91 | 5 टन |
| 5 | सुडकोली पुल (26/540) | अलिबाग-रोहा रा.मा. 91 | 5 टन |
| 6 | सहाण पुल (2/100) | अलिबाग-रेवदंडा प्र.रा.मा. 04 | 16 टन |
| 7 | नवेदर बेली पुल (26/900) | पोयनाड-उसर-भादाणे रा.मा. 90 | 5 टन |
| 8 | देहेन पुल (1/100) | भाकरवड-देहेन प्र.जि.मा. 29 | 5 टन |
पर्यायी मार्गांची व्यवस्था:
◼ पूल क्र. 1 ते 5 साठी:
अलिबाग – पेझारी नाका – कुर्डुस – वेलशेत – आंबेघर – भिसे खिंड मार्गे रोहा
◼ पूल क्र. 6 व 7 साठी:
अलिबाग – उसर – वावे मार्गे रेवदंडा
◼ पूल क्र. 8 साठी:
पांडवा देवी – पोयनाड – पेझारी – श्रीगाव मार्गे देहेन
पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालक आणि ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे की, हा आदेश पुढील सूचना येईपर्यंत लागू राहील आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
