१ ऑगस्ट रोजी दादर येथे कार्यक्रमाचे आयोजन
विनायक पाटील
पेण : पेणचे प्रसिद्ध समाजसेवक आणि वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त एक उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, दादर या शाळेला वॉटर कुलर आणि वॉटर फिल्टर भेट स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय पेणमधील पत्रकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा अपघाती विमा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम १ ऑगस्ट २०२५ रोजी (शुक्रवार) सकाळी ११ वाजता दादर गावात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरेचा, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, प्राचार्य डी.एस. पाटील, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, मराठी पत्रकार संघाचे पेण अध्यक्ष विनायक पाटील, तसेच स्वप्नील पाटील, राज कडू, साधना कांबळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वक्रतुंड मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने शाळेला वॉटर कुलर आणि फिल्टर भेट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक भान ठेवत, पेणच्या पत्रकारांसाठी ५ लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जाणार आहे.
