वार्ताहर
सुधागड, दि. ३१ : श्री. राजेश मपारा यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेलच्या वतीने नवघर (ता. सुधागड) येथील श्री विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ७७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये १८ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यातील १० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया पनवेल येथे करण्यात येणार आहे. याशिवाय १६ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाली हॉस्पिटलला रेफर करण्यात आले, तर ३९ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ५ रुग्णांमध्ये कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाले नाही.

या शिबिराचे यशस्वी आयोजन ट्रस्टचे डॉ. धनंजय, दीक्षा पाटील, कॅम्प कोऑर्डिनेटर दत्तात्रेय ठाकूर, काउन्सलर सोनिया माळी यांनी केले. कॅम्प स्थळी रूपेश जाधव, विरेश्वर मुंढे आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. वैशाली मपारा उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
या नेत्र तपासणी शिबिरामुळे नवघर परिसरातील अनेक गरजू नागरिकांना आरोग्यसेवा मिळाली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
