• Wed. Aug 6th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगांवमध्ये महसूल सप्ताह २०२५ निमीत्त विविध उपक्रम

ByEditor

Aug 1, 2025

लोक अदालतांद्वारे प्रलंबित दाव्यांचा निपटारा : उपविभागीय अधिकाऱ्यांचा पुढाकार

गौतम जाधव
इंदापूर :
महसूल प्रशासनातील प्रलंबित अपील व दाव्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी “महसूल लोक अदालत” चे आयोजन माणगांव येथे करण्यात आले असून, महसूल सप्ताह २०२५ दरम्यान विविध जनहिताच्या उपक्रमांना देखील सुरुवात करण्यात येत आहे. अशी माहीती गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी माणगांवचे प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांनी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल प्रशासनाकडील अपील व दावे प्रलंबित राहण्यावर नाराजी व्यक्त करत त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या आदेशानुसार, माणगाव येथील उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोक अदालतांमध्ये माणगांव व तळा तालुक्यातील प्रलंबित महसूली अपिले व दाव्यांवर सुनावणी घेण्यात येणार असून, खालील तारखांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाणार आहे :

११, १४, १८, २१, २५ व २८ ऑगस्ट २०२५

सर्व संबंधित पक्षकार, विधिज्ञ, व नागरिकांनी आपल्या प्रकरणांबाबत लेखी स्वरूपात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. तसेच, शासनाच्या निर्देशानुसार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसूल दिन” साजरा करण्यात येणार असून, १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “महसूल सप्ताह – २०२५” विविध उपक्रमांद्वारे साजरा होणार आहे.

या आठवड्यात खालीलप्रमाणे उपक्रम राबवले जातील :

  • १ ऑगस्ट : महसूल दिन साजरा, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सन्मान, उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार व लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण.
  • २ ऑगस्ट : अतिक्रमणाच्या पट्टे वाटप कार्यक्रम.
  • ३ ऑगस्ट : पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी व वृक्षारोपण.
  • ४ ऑगस्ट : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान.
  • ५ ऑगस्ट : विशेष सहाय्य योजनेंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) न झालेल्या लाभार्थ्यांना मदत.
  • ६ ऑगस्ट : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन व धोरणानुसार निर्णय.
  • ७ ऑगस्ट : M-Sand धोरणाची अंमलबजावणी व महसूल सप्ताह समारोप.

या सप्ताहात तालुका, मंडळ व सझे पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!