पनवेल (प्रतिनिधी): पनवेल येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय “श्रावण महोत्सव 2025” अंतर्गत आयोजित भव्य पाककला स्पर्धेत सेजल दीपक खराडे-चाफेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे.
भारत विकास परिषद – पनवेल शाखा आणि स्व. सौ. मृणाल लोढे सेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या या महोत्सवात “ब्रेकफास्टचा पदार्थ” या विषयावर पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सेजल यांनी या स्पर्धेत भाग घेऊन पहिली फेरी पार केली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे ‘मिती ग्रुप’ आणि ‘पितांबरी रुचियाना’ यांच्या विशेष सहकार्याने आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत पुढील फेरीसाठीही नाव नोंदले गेले आहे.
सेजल यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या मेहनतीसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचेही मोठे योगदान आहे.