• Tue. Aug 5th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्येत वाढ – ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

ByEditor

Aug 4, 2025

मिलिंद माने
महाड :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यानुसार महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत. यामुळे रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, प्रभाग रचनेचा अधिकार पूर्णतः राज्य सरकारकडे आहे, त्यामुळे यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. विशेषतः लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेच्या हस्तक्षेप याचिकेलाही न्यायालयाने नकार दिला आहे.

ओबीसी आरक्षणासहच निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मे २०२१ पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता १९९४ ते २०२२ दरम्यानच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीप्रमाणेच घेतल्या जाणार आहेत.

मागील महिन्यात (६ मे २०२५ रोजी) सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुकांचे चार आठवड्यांत नोटिफिकेशन काढण्याचे आणि चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते.

रायगड जिल्हा परिषदेतील नवीन गट व गणांची विभागणी:

रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून, ६६ जिल्हा परिषद सदस्य आणि १३२ पंचायत समिती सदस्य असणार आहेत. तालुकानिहाय विभागणी पुढीलप्रमाणे:

तालुकाजिल्हा परिषद गट क्र.सदस्यसंख्यापंचायत समिती गण क्र.गणसंख्या
पनवेल1 ते 991 ते 1818
कर्जत10 ते 14619 ते 3012
खालापूर15 ते 19531 ते 4010
सुधागड20 ते 21241 ते 444
पेण22 ते 28645 ते 5612
उरण29 ते 33557 ते 6610
अलिबाग34 ते 41867 ते 8216
मुरुड42 ते 43283 ते 864
रोहा44 ते 48587 ते 9610
तळा49 ते 50297 ते 1004
माणगाव51 ते 555101 ते 11010
म्हसळा56 ते 572111 ते 1144
श्रीवर्धन58 ते 592115 ते 1184
महाड60 ते 645119 ते 12810
पोलादपूर65 ते 662129 ते 1324

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!