• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

ByEditor

Aug 12, 2025

अमुलकुमार जैन
रायगड :
रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या १८ महिन्यांत जवळपास ३९० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत रायगड जिल्ह्यात एका पाच वर्षीय मुलावर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना एका शासकीय वसतिगृहात घडली असून, आरोपी मुलाने पीडित मुलास झाडीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. पीडित मुलास गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी सुरू असून, पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार हे समाजासाठी गंभीर आव्हान बनले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!