• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात मुसळधार पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत

ByEditor

Aug 18, 2025

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यात सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी होऊन तालुक्यातील शेकडो गावातील लोकांना माणगाव शहराकडे येण्याचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यातील अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले असून माणगाव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरातून जाणाऱ्या काळ नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नदीच्या जवळ असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!