• Thu. Apr 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी

ByEditor

Aug 19, 2025

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, खासगी अनुदानित व बिगरअनुदानित शाळा, आश्रमशाळा तसेच सर्व प्रकारच्या माध्यमांच्या शाळा आणि व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय पालकांना आणि शिक्षकांना दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!