विनायक पाटील
पेण (२४ ऑगस्ट) : पेण तालुक्यातील भाजपचे युवा नेतृत्व गणेश दत्तात्रय पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश कुंडलिक थोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची मान जगभरात उंचावली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळत आहे. या कार्यकुशल नेतृत्वाचा आदर्श ठेवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि युवा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची जबाबदारी गणेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर पेण तालुका भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील, आस्वाद पाटील, महेश मोहिते, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरवे, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी गणेश पाटील यांचे अभिनंदन केले.
“वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे जपणार असून, युवांच्या हितासाठी आणि पक्ष संघटन वाढीसाठी निष्ठेने काम करणार,” अशी भावना नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील यांनी व्यक्त केली.
