पेण | विनायक पाटील
कासू येथील करण वासुदेव म्हात्रे यांची भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे कासू परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, आमदार रवींद्र पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील व लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये करण म्हात्रे यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
“पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजोपयोगी काम करत भारतीय जनता पार्टीची विचारधारा ग्रामीण भागात रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” अशी प्रतिक्रिया करण म्हात्रे यांनी निवडीच्या वेळी दिली.
या प्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, महेश मोहिते, आस्वाद पाटील, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे तसेच माजी जि.प. सदस्य संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये –
जिल्हा सरचिटणीस : गणेश पाटील, रोशन चाफेकर, पुनीत शेठ
जिल्हा उपाध्यक्ष : करण म्हात्रे, भास्कर पार्टे, भूषण शहासने, माणिकराज गावंड, शुभम भावेकर
जिल्हा चिटणीस : अजिंक्य अशोक पाटील
जिल्हा कार्यकारिणी सदस्य : जान्हवी रवींद्र गोळे, समृद्धी साळवी
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.