• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य वाटप

ByEditor

Aug 26, 2025

सोगाव । अब्दुल सोगावकर

अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागातील सात गावांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने सुमारे ५३० कुटुंबाना गणेश पूजन साहित्य वाटप उपक्रमाचे मापगाव येथील गणेश मंदिरात रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांचे सर्व कार्यकर्ते हे मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समाजातील ग्रामस्थांना त्यांचे सण आनंदात साजरे करण्यासाठी प्रत्येक सणांमध्ये नेहमीच मदत करत असतात, तसेच ग्रामस्थांसाठी दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व इतर उपक्रम राबवित असतात. यावर्षी देखील मापगाव, बहिरोळे, बेलवली, मुशेत, चोरोंडे, सोगाव, मुनवली या सात गावांतील सुमारे ५३० गणेश भक्तांना पूजेचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!