मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली त्यानंतर सगळ्यांच्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या होत्या. पोलीस आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी आणखी एक दिवस आंदोलनाला परवानगी देत काही अटीशर्ती घातल्या आहेत.
आमच्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आझाद मैदानावर सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याच्या चौकटीत त्यांची मागणी बसते का याबाबत विचार करत असून कायदेपंडितांकडून त्याबाबत माहिती घेत आहोत, असे मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती म्हणाले होते. त्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे.
