• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चार वर्षानंतरही कळमजे पूलाचे काम अपूर्णच! प्रवाशांचे हाल

ByEditor

Aug 30, 2025

भाजपने तहसीलदारांना दिले निवेदन; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

माणगाव । सलीम शेख
मुंबई–गोवा महामार्गावरील माणगावजवळील कळमजे फाटा येथे असलेला गोद नदीवरील पूल गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण स्थितीत असून पावसाळा आला की पूल पाण्याखाली जाणे ही वारंवारची समस्या झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होत असून वाहनधारक व प्रवाशांना निजामपूरमार्गे पर्यायी रस्ता वापरावा लागत आहे. परिणामी प्रवासाचा वेळ वाढतो व मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर भाजप माणगाव तालुका माजी अध्यक्ष संजय आप्पा ढवळे, भाजप नेते चिन्मय मोने, दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस गोविंद कासार, माजी उपतालुका अध्यक्ष अरुण पेणकर, सुरेंद्र साळी, कुर्ले आण्णा, शर्मिला सत्वे, रितेश निवाने, राजू मुंढे, योगेश पालकर, राहुल धूपकर, आनंन राजबर, अश्विनी कडू, जयेंद्र मुंढे, सदानंद अडीत, सोहम शिर्के, मृदल भोनकर, भारत जैन, गणेश राजपुरकर, दीपक भोसले, तुषार नवगणे, जयदीप करडे, रोहित कदम, विश्वास कदम, विशाल शिगवण, रेवती कोळी, राकेश ढवळे, देवेंद्र ढवळे, फौजी अशोक घाग यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून पुलाची दुरवस्था अधोरेखित केली.

सदर पुलाच्या दुरुस्तीचे व नव्याने बांधकामाचे प्रयत्न मागील चार वर्षांपासून सुरू आहेत. मात्र काम रखडल्याने पुलाची स्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी मुंबई–कोकण मार्गावरील वाहनांना कोलाड–निजामपूर किंवा निजामपूर–खोपोली मार्गे वळसा घालावा लागला. यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक व प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, या कामाचा ठेका ज्या कंत्राटदाराला देण्यात आला होता त्याची मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यावर भाजप माजी तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांनी तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
ते म्हणाले –

“या पुलाचे काम तातडीने पूर्ण झाले नाही, तर भाजप उग्र आंदोलन उभारेल. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून शासन निधीचा अपव्यय रोखावा. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली नाहीत तर जनतेचा संताप अनावर होईल.”

गोद नदीवरील पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

हे हि पहा

उरणमध्ये चमत्कार! श्रीस्वामी समर्थांच्या मठात चरणखूणा प्रकट

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!