सोगांव । अब्दुल सोगावकर
प्रसाद (पिंट्या) गायकवाड मित्रमंडळ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी येथील ‘चोंढीचा राजा’ या साखरचौथ गणपतीचे दीड दिवसाने मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
दिड दिवसाच्या काळात भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी श्रीं चे दर्शन घेतले. रायगड जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय शिवथारे मांडवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी, तसेच अलिबाग तालुक्यातील प्रमुख मान्यवरांचा समावेश होता. पिंट्या गायकवाड मित्रमंडळ व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विसर्जन मिरवणुकीत हिंदुराजा गुरुकुल शिवकालीन विद्या मर्दानी खेळ आखाडा, संगमनेर यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा समावेश होता. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गणेशभक्तांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चोंढी पुलाजवळील विसर्जन घाटावर रात्री उशिरा श्रींचे विसर्जन करण्यात आले.
