• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात कारच्या धडकेत सायकलस्वार जखमी

ByEditor

Aug 13, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगाव कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या कारची सायकलला धडक लागल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार मुलगा जखमी झाला. सदरचा अपघात दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ :३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद भानुदास नरसिंगराव बिरासदार (वय-४८) रा. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघातातील आरोपी अविनाश बाबू भूरण (वय ४२) रा. पनवेल यांनी त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीची नेकस्वान कार अतिवेगाने चालवून सायकलला धडक दिली. या अपघातात सायकलस्वार मुलगा राजवर्धन दिपक गंगाजी हा जखमी झाला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गुन्हा.रजि.नं २६३/२०२३ भादंवि संहिता कलम २७९, ३३७, ३३८ मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!