सोगाव । अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील तिनवीरा येथे बुधवार, १७ सप्टेंबर रोजी ‘सेवा पर्व २०२५’ या सामाजिक वनीकरण अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मौजे तिनवीरातील श्री. टी. टी. पाटील महाविद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची मोठ्या उत्साहात लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमात सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती गायत्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वनक्षेत्रपाल श्रीमती संस्कृती पाटील, वनपाल विजय पाटील, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक लहू तरे सर, शिक्षक व शिक्षक-मंडळी, वनरक्षक कोळेकर व दणाने आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट परिसरात हरितावरण वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे होते. उपस्थित सहभागी सर्वजण उत्साहाने वृक्षारोपणात भाग घेऊन ‘सेवा पर्व २०२५’ च्या अभियानाला यशस्वी केले.
