अलिबाग । अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यात एका पन्नासी उलटलेल्या इसमाकडून दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचा सविस्तर आढावा असा आहे की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी परत येत होती. त्यावेळी, तिच्या घराजवळ राहणारा आरोपी (वय ५४) हिने मुलीला त्याच्याकडे बोलावले. आरोपीने आपल्या मोबाइलमध्ये असलेला अश्लील व्हीडीओ मुलीला दाखवला आणि तिचे शरीराला हाताने स्पर्श करीत म्हणाला की, आता तू पण माझी पप्पी घेणार ना असे बोलून आरोपी विजय याने मनास लज्जा वाटेल असे बोलून व वर्तन करुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
घडलेली घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने लगेचच नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. अलिबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी ११६/२०२५ नोंद केली असून गुन्हा भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ७२(२), ७४, ७५(३) तसेच बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ७, ८, ९(एम), १०, ११(३), १२ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
अधिक तपास अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपी विरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
