• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा पाणीपुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणी नगराध्यक्षा फरहीन बशारत यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

ByEditor

Sep 25, 2025

“१५ दिवसांत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार” –नगराध्यक्षा

म्हसळा । वैभव कळस
म्हसळा शहरासाठी खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा प्रकल्प सुरू आहे. या योजनेसाठी ठेकेदाराने आणलेल्या पाईपमधून तब्बल २५ लाख रुपये किमतीचे पाईप मे महिन्यात चोरीला गेले. मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस सुराग लागलेला नाही.

या चोरी प्रकरणाच्या तपासाची माहिती जाणून घेण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरहीन अजीज बशारत यांनी शुक्रवारी म्हसळा पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिस निरीक्षक संदिप कहाले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी नगराध्यक्षा बशारत यांनी शासकीय खर्चातून म्हसळा शहरात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था १५ दिवसांत कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती सुनिल शेडगे, अजीज बशारत, उपनिरीक्षक रोहिणकर, महिला पोलीस सोनवणे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच शहराच्या विकासासाठी गतीमान पावले उचलल्यामुळे नगराध्यक्षा फरहीन बशारत यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!