अलिबाग । प्रतिनिधी
जयहिंद लोकचळवळीचे मार्गदर्शक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यातील पडसरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात आश्रमशाळेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना पुस्तके, वर्कबुक्स, लेखन साहित्य आणि इतर शालेय साहित्याचे लाभ दिले गेले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला, तर शिक्षक वर्गाने या उपक्रमाचे स्वागत केले.
आमदार सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान मानले जातात. अभ्यासू आणि कार्यक्षम युवा नेते म्हणून त्यांना राज्यभर ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री पुरवणे हा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमात जयहिंद लोकचळवळीचे कोकण संघटक ॲड. प्रथमेश पाटील, जिल्हा संघटक ॲड. कौस्तुभ पुनकर, कार्यकारणी सदस्य संजोग शेठ, हाशिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर पाटील, अंकुर मोकल यांसह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवून शिक्षणात प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राबविलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
