• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आशा सेविकांनी विविध प्रश्नांसंदर्भात घेतली आ. भरतशेठ गोगावले यांची भेट

ByEditor

Aug 13, 2023

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील आशा सेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात शासकीय विश्रामगृह माणगाव येथे शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी महाड-पोलादपूर-माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली. सदर बैठकीत आ. गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून रायगड जिल्ह्यातील आशा सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या बैठकीला उप जिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, युवासेना शिंदे गट जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुकाप्रमुख अँड. महेंद्र मानकर, उप तालुकाप्रमुख नितीन पवार, युवानेते अच्युत तोंडलेकर आदींसह तालुक्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!