अमूलकुमार जैन
अलिबाग : शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील बे विस्टा गृह सहकारी सोसायटीमधील एका सदनिकेमधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील बे विस्टा नामक सहकारी गृह सोसायटीमधील देवाश अशोक झवेरी यांच्या मालकीच्या ३०४ या सदनिकेमध्ये असणाऱ्या वातानुकूलित यंत्रणेत आज दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती परंतु रूममध्ये कोणतेही नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही.