नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील घटना
विनोद भोईर
पाली : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील गतिरोधकवर मुंबईकडून कोलाडकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरवर कलंडल्याने कॉईल रस्त्यावर पडण्यापासून वाचली. सदर घटना रविवार (दि. 13) दुपारी घडली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती नागोठणे पोलीस ठाण्यात कळताच वाकण नाका येथील वाहतूक पोलीस मनोहर माळी तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली असून या महामार्गावर अपघाताची मालिका रोज सुरूच असल्याने प्रवाशी तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.