रायगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब असाधारण क्र.317 दि.9 सप्टेंबर 2025 मधील ग्राम विकास विभागाची अधिसूचना क्र.जिपनि-2025/प्र.क्र.12ज/पंरा-2, दि.9 सप्टेंबर 2025 नुसार रायगड जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील 15 पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षाच्या कालावधीकरिता खालील प्रवर्गाप्रमाणे निश्चित करुन देण्यात आले आहे.
अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 0 आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे. अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 1 आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 2 आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 2 आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 4 आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिला) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदांची संख्या 4 आहे.
तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे दि.9 सप्टेंबर 2025 च्या शासन अधिसूचनेप्रमाणे 15 पंचायत समित्यांचे सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार, दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता विशेष सभा अयोजित करण्यात आली आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या आरक्षण सोडत सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
