रायगड | प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १३ ऑक्टोबर) प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सोडतीत अनुसूचित जाती-जमाती तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली असून अनेक तालुक्यांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या आरक्षणानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील गटांसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नामाप्र आणि सर्वसाधारण प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. खाली प्रत्येक तालुक्यानुसार जाहीर झालेल्या आरक्षणाचा तपशील दिला आहे.
पनवेल तालुका
वावंजे — नामाप्र (महिला)
नेरे — अनुसूचित जमाती
पालीदेवद — अनुसूचित जाती (महिला)
पळस्पे — सर्वसाधारण (महिला)
वावेघर — नामाप्र (महिला)
वडघर — सर्वसाधारण (महिला)
गव्हाण — सर्वसाधारण (महिला)
केळवणे — नामाप्र
कर्जत तालुका
कळंब — अनुसूचित जमाती
कशेळे — अनुसूचित जमाती (महिला)
माणगांव तर्फे वरेडी — सर्वसाधारण (महिला)
नेरळ — सर्वसाधारण (महिला)
कडाव — नामाप्र
मोठे वेणगाव — अनुसूचित जमाती (महिला)
खालापूर तालुका
चौक — अनुसूचित जमाती (महिला)
वासांबे — सर्वसाधारण
सावरोली — सर्वसाधारण
आत्करगाव — सर्वसाधारण (महिला)
सुधागड तालुका
जांभुळपाडा — सर्वसाधारण (महिला)
राबगाव — अनुसूचित जमाती
पेण तालुका
जिते — अनुसूचित जमाती (महिला)
दादर — सर्वसाधारण
वडखळ — सर्वसाधारण
महालमिऱ्या डोंगर — अनुसूचित जमाती
शिहू — सर्वसाधारण (महिला)
उरण तालुका
नवघर — सर्वसाधारण (महिला)
जासई — नामाप्र
चाणजे — सर्वसाधारण (महिला)
चिरनेर — नामाप्र
अलिबाग तालुका
शहापुर — सर्वसाधारण
आंबेपूर — सर्वसाधारण (महिला)
आवास — सर्वसाधारण
थळ — सर्वसाधारण (महिला)
चेंढरे — नामाप्र
चौल — सर्वसाधारण
कावीर — नामाप्र
मुरुड तालुका
कोर्लई — सर्वसाधारण (महिला)
राजपुरी — सर्वसाधारण
रोहा तालुका
नागोठणे — सर्वसाधारण
आंबेवाडी — नामाप्र (महिला)
भुवनेश्वर — सर्वसाधारण
घोसाळे — नामाप्र (महिला)
तळा तालुका
चरईखुर्द — सर्वसाधारण (महिला)
रहाटाड — नामाप्र (महिला)
माणगाव तालुका
निजामपूर — सर्वसाधारण
तळाशेत — सर्वसाधारण (महिला)
मोर्बा — सर्वसाधारण
गोरेगाव — अनुसूचित जाती
म्हसळा तालुका
पाभरे — सर्वसाधारण
पांगळोली — सर्वसाधारण
श्रीवर्धन तालुका
बोर्लीपंचतन — अनुसूचित जमाती (महिला)
आराठी — सर्वसाधारण (महिला)
महाड तालुका
बिरवाडी — नामाप्र (महिला)
खरवली — नामाप्र (महिला)
नडगाव तर्फे बिरवाडी — सर्वसाधारण
दासगाव — नामाप्र
करंजाडी — सर्वसाधारण
पोलादपूर तालुका
कापडे बुद्रुक — नामाप्र
लोहारे — सर्वसाधारण
राजकीय हलचालींना वेग
या आरक्षण घोषणेनंतर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी नव्या समीकरणांचा अभ्यास सुरू केला आहे. काही ठिकाणी महिला आरक्षणामुळे अपेक्षित उमेदवारांना मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे, तर अनुसूचित प्रवर्गातील काही गटांतून नव्या चेहऱ्यांचा उदय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
