अलिबाग । सचिन पावशे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन या नेमणुकीची अधिकृत घोषणा केली आहे.
महिला सक्षमीकरणास आणि नेतृत्वाला चालना देणारा हा निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी आनंदाचा विषय ठरला आहे.भाजपा महिला मोर्चा ही संघटना महिला उत्थान आणि समाजातील नारी शक्तीला अग्रक्रम देणारी असून, नव्या नेतृत्वामुळे विविध सामाजिक उपक्रम आणि महत्त्वपूर्ण राजकीय मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा आहे. आगामी काळात महिला मोर्चा अधिक बांधणीला आणि संघटनात्मक कार्यात नवी दिशा देईल. ॲड. मनस्वी महेश मोहिते ह्या त्यांच्या कार्यक्षमता, सामाजिक योगदान आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून परिचित आहेत. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या आणि विकासाचा नवा अध्याय लिहिण्याच्या दृष्टीने या नेमणुकीची मोलाची भूमिका राहील.
महिला नेतृत्वाच्या वाढीने भाजपच्या राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
