• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सहयोग पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सेवाभावी उपक्रम

ByEditor

Oct 18, 2025

अलिबाग । सचिन पावशे
सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वलपबचत प्रतिनिधींनी स्वतः वर्गणी काढून सेवाभावातून दिपावलीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला.

या उपक्रमांतर्गत ॲड. जयेंद्र गुंजाळ संचलित “श्री समर्थकृपा वृद्धाश्रम, परहुर (ता. अलिबाग)” या संस्थेला ₹२५,०००/- इतक्या डिमांड ड्राफ्टद्वारे आर्थिक सहाय्य करण्यात आले. हा डिमांड ड्राफ्ट संस्थेचे व्यवस्थापक वैभव बोर्लीकर यांच्या हस्ते वृद्धाश्रमास प्रदान करण्यात आला.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, संचालक हरेश गायकर, संचालक मोहन वैद्य, तसेच कर्मचारी मयुरी ठाकूर, गणेश मौर्य, नरेंद्र पाटील, वैष्णवी पिंपळे, निलेश पाटील, रिया पाटील, पूर्वजा वेताळ, शुभम सुंकले, स्वल्पबचत प्रतिनिधी सुनिल तांडेल, अनिल आंबोले, गितेश गुरव, संदेश कवळे आणि वृत्तपत्र छायाचित्रकार जितु शिगवण उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे सहयोग पतसंस्थेने समाजातील दुर्बल घटकांप्रती आपली सामाजिक जबाबदारी आणि सेवाभाव अधोरेखित केला असून, रौप्यमहोत्सवी वर्ष अधिक अर्थपूर्ण बनविले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!