• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रमिला संतोष पवार ‘कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित

ByEditor

Oct 28, 2025

उरण : विठ्ठल ममताबादे
कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर-पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य कृती या पुरस्कारासाठी राज्यभरातून आलेल्या साहित्य कृती मधून उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरु पोर्ट विद्यालयातील शिक्षिका प्रमिला पवार यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानबिंदू’ या पुस्तकाला साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक यांच्या हस्ते प्रमिला संतोष पवार यांना कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील शिक्षिका प्रमिला संतोष पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!