• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक! नागोठणे येथील जैन मंदिरातील पुजाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

ByEditor

Oct 28, 2025

नागोठणे | महेंद्र म्हात्रे
नागोठणे शहरातील जैन मंदिरातील पुजाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर २०२५) रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मृत पुजाऱ्याचे नाव मयुरकुमार महेशभाई राठवा (वय २३ वर्षे) असे असून, ते  बालपरी, ता. माकणी, जि. छोटा उदयपूर, राज्य गुजरात येथील रहिवासी होते. सध्या ते आराधनाभवन, तिसरा मजला, जैन मंदिरासमोर, बाजारपेठ, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड येथे वास्तव्यास होते. मयुरकुमार हे काही दिवसांपूर्वीच जैन मंदिरात बदली (काही काळासाठी) पुजारी म्हणून रुजू झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आराधनाभवन इमारतीतील एका खोलीत मयुरकुमार यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिराच्या पुजाऱ्याने आत्महत्या करणे ही घटना या परिसरात पहिल्यांदाच घडल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला असून घटनेची माहिती तात्काळ नागोठणे पोलिस ठाण्याला देण्यात आली.

या प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अ.नं. २६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रुईकर करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!