श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील दांडा विभागातून शिवसेनाला (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. दांडा विभागप्रमुख सुरेंद्र तबिब, सिद्धेश चुणेकर, दीपेश चौले, उमेश चोरढेकर आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आज खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक तसेच स्थानिक नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी “विकास आणि जनसेवा हाच आमचा हेतू!” अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लवकरच खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत मोठा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हि एक मोठी राजकीय घडामोड असल्याचे मानले जात आहे, ज्यामुळे श्रीवर्धन शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
