• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीपंचतन उपसरपंच पदी सायली गाणेकर

ByEditor

Aug 14, 2023

अभय पाटील
बोर्लीपंचतन :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सायली शंकर घाणेकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच भूमी रमेश कांबळे यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सायली शंकर गाणेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ज्योती परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सायली शंकर घाणेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी नियुक्त झाल्याची घोषणा सरपंच ज्योती परकर यांनी केली. त्यावेळेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदसय उपस्थित होत्या नवनियुक्त उपसरपंच सायली शंकर गाणेकर यांचे माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद ढेबे, ग्रामविकास अधिकरी अनंत सुळ, शाखाप्रमुख गजू भाटकर, चंद्रकांत धनावडे, माजी सरपंच निवास गाणेकर, माजी उपसरपंच अनंत पयेर, मनोहर परकर, सुरेश हेदुकर, प्रकाश शहा यांनी अभिनंदन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!