नगराध्यक्षासह सर्व प्रभागांमध्ये मनसेचे उमेदवार निवडणूक लढविणार -जितेंद्र पाटील
पेण | विनायक पाटील
निवडणुकीसाठी एक मतही अति महत्वाचे असते, एका मताने देशाचे सरकार पडले आहे, यामुळे कोणीही कोणाला कमी समजू नका मनसे स्वबळावर लढणारी सेना आहे, पेण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी २४ जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या रेल्वे इंजिन या चिन्हावर स्वबळावर लढणार आहे.या निमित्त चर्चा करण्यासाठी आज पेण येथे सर्व मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात येऊन उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे पत्रकार परिषद घेऊन मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज असल्याचे सांगितले.

रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली मनसे येणारी पेण नगरपरिषदेची निवडणूक सर्वच्या सर्व उमेदवार व थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन लढविणार असल्याने चर्चा बैठकीचे आयोजन बैठकीस रायगड जिल्हा अध्यक्ष जितू पाटील, रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकुर, मनोहर पाटील, मनसे महिला उपजिल्हाध्यक्ष छाया शिंदे, पेण तालुका अध्यक्ष गौरी वोरा-पाटील, पेण तालुका अध्यक्ष सुदेश संसारे, पेण शहर अध्यक्ष प्रकाश मनोरे पेण शहर सचिव रुपेश पाटील, निकिता पाटील, हिरामण जेधे, सिद्धार्थ संसारे, दिलीप पाटील, ललित पाटील, अमोल पाटील आदी मनसैनिक उपस्थित होते.
