• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा परिषद: शिवसेना गटनेतेपदी मानसी दळवी यांची बिनविरोध निवड

ByEditor

Feb 13, 2026

अलिबाग: विशेष प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी अलिबाग येथील नवनिर्वाचित सदस्या मानसी दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

​ या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित सदस्यांना जिल्हा परिषदेच्या आगामी कामकाजाबाबत आणि धोरणांबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लोकहिताची कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

​दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गटनेतेपदासाठी मानसी दळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि एकमुखी पाठिंबा दर्शवला. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची धुरा आता एका महिला नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे.

महायुतीची सत्ता येणार: आमदार दळवी

निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी विश्वास व्यक्त केला की, “आगामी काळात सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!