• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह 30 दिवसात परत करा? निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

ByEditor

Aug 14, 2023

अन्यथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी शाखेतून काढण्याचा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा महाड स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना इशारा!

मिलिंद माने
महाड:
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने सेवेच्या काळात आयुष्यात जमवलेली पुंजी मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर ऑनलाइन कर्ज काढून सात लाख 45 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार महाड स्टेट बँकेच्या शाखेत घडला असून याबाबत स्टेट बँके च्या महाड शाखा व्यवस्थापकाने तीस दिवसात व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याला रक्कम परत न केल्यास राज्य परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सगळ्या ठेवी स्टेट बँक शाखा महाड कार्यालयातून काढून घेण्याचा निर्वाणीचा इशारा निवृत्त कर्मचारी संघटनेने आज दिला.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील व -राठी गावचे प्रभाकर शंकर गोठल हे मागील वर्षी एसटी वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेली 14 लक्ष रुपयांची रक्कम त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखेत 26/08/2022 रोजी. एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेवली होती. महाड स्टेट बँकेच्या शाखेत एक वर्षाच्या काळासाठी ठेवण्यात आलेली मुदत ठेवीची मुदत संपत आल्याने महाड स्टेट बँकेच्या शाखेकडून 7/08/ 2022 रोजी त्यांना. त्यांच्या भ्रमणध्वनीवर मेसेज आला की तुमच्या मुदत ठेव वरील कर्जाची परतफेड करावी असा असा मेसेज त्यांना आल्याने त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केली आस्था हा सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

महाड स्टेट बँकेच्या शाखेत चौकशी करण्यासाठी प्रभाकर शंकर गोठल गेले असता त्यांच्या मुदत ठेवीच्या रकमेवर 28 डिसेंबर 2022 रोजी एक लक्ष 30 हजार, दोन लक्ष 45 हजार व 3,70,000 असे सात लक्ष 45 हजाराचे कर्ज ऑनलाईन काढण्यात आल्याचे दिसून आले ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचे अवसान गळाले व त्याबाबत त्यांना मानसिक धक्का बसला होता.

महाड स्टेट बँकेच्या शाखेत 14 लक्ष रुपयांची मुदत ठेव ठेवणारे प्रभाकर शंकर गोठल यांनी मी अशा प्रकारे कोणतेही कर्ज घेतलेले नसून माझी मूळ प्रमाणपत्र ही माझ्या जवळच आहेत तर मग हे कर्ज कुणी घेतले आणि कशाप्रकारे दिले याची चौकशी करून माझ्यावर अकारण लादलेला कर्जाचा बोजा त्वरित उतरून द्यावा व माझ्या मुदत ठेवी पूर्वत कराव्या अशी मागणी त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे केली असता या शाखा व्यवस्थापकाने याबाबत हात वर केले हे तुम्ही ऑनलाईन कर्ज घेतले असून तुम्हाला तुमच्या भ्रमणध्वनी वरती ओटीपी आला असेल व तो तुम्ही स्वीकारला असेल म्हणूनच हे कर्ज मंजूर झाले असेल असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी केला.

याबाबत प्रभाकर शंकर गोठल यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद खोपडे हे याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच याबाबत सायबर क्राईम शाखेकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाड स्टेट बँकेच्या शाखेमध्ये महाड तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या तसेच भारतीय सैन्यामधून निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मुदत ठेवी या बँकेच्या शाखेत असल्याने याबाबत देखील अशीच घटना घडली तर काय? असा प्रश्न गोठल यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना विचारला असता त्यावर त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर सावंत, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, चंद्रकांत बेलोशे ,सचिव जयंत विचारे, कार्याध्यक्ष कृष्णा डावरुंग, सहसचिव नाना गोडबोले ,प्रदीप सकपाळ, खजिनदार एस के पवार, प्रसिद्धी सचिव दिलीप जाधव, सल्लागार एस. एस. जाधव, राजन पालकर, व चंद्रकांत सकपाळ या एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापनाजवळ चर्चा करून त्यांना एक निवेदन सादर केले असून निवृत्त कर्मचारी प्रभाकर शंकर गोठल या कर्मचाऱ्यांची ऑनलाइन गंडा घालून काढलेली रक्कम व्याजासह 30 दिवसात पूर्ण न केल्यास राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखेत अशाच प्रकारच्या मुदत ठेवी ठेवलेले आहेत त्या सर्व ठेवी काढून घेण्यात येतील असा निर्वाणीचा लेखी इशारा महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात त दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!