प्रतिनिधी
नागोठणे : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य, सर्वसामान्यांना, अडीअडचणीमध्ये आर्थिक मदत करणारी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार करण्यात आला.

आज देश स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. 15 आॅगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसाचे महत्व म्हणून राष्ट्रीय झेंड्याला अभिवादन करण्यासाठी ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम श्री अष्टविनायक ग्रामीण पतसंस्थेच्या आवारात पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ असे ब्रीदवाक्य असलेल्या ‘रायगड जनोदय’चे पत्रकार किरण लाड यांची रायगड जनोदयचे संपादक मंगेश पत्की यांनी त्यांच्या कामाचा धडाका बघून उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन पत्रकार व उपसंपादक किरण लाड व निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश जाधव यांचा पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या मंगलमय कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर, संस्थापक अध्यक्ष जयराम पवार, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सेक्रेटरी प्रफुल्ल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे, संचालक रोहिदास हातनोलकर, दिलिप धाडसे, दिनेश घाग, दिलीप सोनावणे, रविंद्र वाजे, संचालिका श्वेता चौलकर, वृक्षाली जोगत, संध्या सांगले, तज्ञ स्विकृत संचालक प्रकाश जाधव, राजेंद्र गायकर, राकेश चितळकर, तडजोड कमिटीचे सदस्य सखाराम ताडकर, संतोष चितळकर, शेखर जाधव, पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापिका शैलेजा घासे, कर्मचारी वर्ग, पिग्मी कर्मचारी, वरिष्ठ पत्रकार श्यामकांत नेरपगार तसेच नागोठणे शहरातील मान्यवर मधुकर चौलकर, नामदेव चितळकर, प्रकाश मोरे, निलोफर पानसरे, नितीन पत्की, राजेंद्र मोदी, पांडुरंग नागोठणेकर, मनोज गायकवाड, गिरीधर दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागोठणे तसेच केएमजी विभागात सामाजिक काम करीत असतांना ‘रायगड जनोदय’चे संपादक मंगेश पत्की यांनी त्यांच्या पेपरमध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधी दिली. पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, न्याय देण्यासाठी शोध पत्रकारिता चालू केली. या माझ्या कामाचा धडाका बघून संपादक पत्की यांनी ‘रायगड जनोदय’ च्या उपसंपादकपदी नेमणूक केली. नागोठणे शहरात कार्यरत असणारी सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची श्री अष्टविनायक ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर, संस्थापक अध्यक्ष जयराम पवार, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी तसेच सर्व संचालक, संचालिका व कर्मचारी, मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ‘रायगड जनोदय’चा उपसंपादक झाल्याबद्दल माझा सत्कार केला त्याबद्दल मी पतसंस्थेचा ऋणी तसेच आभारी आहे. पतसंस्थेने सत्कार केला म्हणजे माझ्या कुटुंबाने सत्कार केला आहे. श्री अष्टविनायक ग्रामीण पतसंस्था नेहमीच गरजूंना कोणताही भेदभाव न करता आर्थिक मदत करीत असते. तसेच विविध सामाजिक संस्थाना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी वेळोवळी मदत करीत असते. श्री अष्टविनायक पतसंस्था वार्षिक जनरल मिटींगमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर तसेच केएमजी विभाग व शहरातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करीत असते. आज देश स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आजच्या शुभदिवशी माझा सत्कार पतसंस्थेने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केल्याबद्दल मी आभार व्यक्त करीत आहे.
–किरण लाड,
उपसंपादक, रायगड जनोदय.