श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन सायगाव ग्रामपंचायत हद्दीत मुख्य रस्ता लागत गंभीर स्वच्छता समस्यांनी ग्रस्त आहे. रस्त्याच्या कडेला साचलेली घाण, कचरा व अस्वच्छता यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांपासून प्रवासी, दुकानदार आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
ग्रामपंचायतीने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वच्छतेअभावी निर्माण झालेली अस्वस्थता व आरोग्यधोका लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
