महाड । मिलिंद माने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून महाड नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे तहसीलदार महेश शितोळे आणि नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.

महाड नगर परिषदेतील १० प्रभागांतील एकूण २० जागांसाठी झालेल्या या मोठ्या प्रमाणातील उमेदवारीमुळे आगामी निवडणूक अतिशय अटीतटीची ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात नगरसेवक पदासाठी एवढ्या संख्येने अर्ज प्रथमच प्राप्त झाल्याची नोंद यावेळी घेण्यात आली.
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार
1) चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे (शिवसेना–उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2) सुदेश शंकर कलमकर (राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार गट)
3) सुनील वसंत कविस्कर – दोन अर्ज दाखल (शिवसेना–शिंदे गट)
4) गणेश सुरेश कारंजकर (अपक्ष)
5) अनिकेत अनिल कविस्कर (शिवसेना–शिंदे गट)
6) पराग पद्माकर वडके (अपक्ष)
7) संकेत दीपक वारंगे (राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार गट)
नगरसेवक पदासाठी पक्षनिहाय अर्जांची स्थिती
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): 1
- भारतीय जनता पक्ष: 5
- शिवसेना (शिंदे गट): 27
- राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार गट: 31
- राष्ट्रीय काँग्रेस: 6
- प्रहार जनशक्ती पक्ष: 2
- अपक्ष: 1
एकूण उमेदवार – 74
इतक्या मोठ्या प्रमाणातील उमेदवारी अर्जांमुळे महाड नगर परिषदेची निवडणूक यंदा अधिक रंगतदार आणि चुरशीची होणार असून, बहुकोनी लढत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
