• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

JSW Aspire Dolvi उपक्रम अंतर्गत कळवे गावात वाचनालयाची सुरुवात

ByEditor

Nov 27, 2025

पेण । विनायक पाटील
पेण तालुक्यातील २६ शाळांमध्ये ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेल्या JSW Aspire डोलवी उपक्रम अंतर्गत १६०० विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य, गणित व भाषा या विषयांवरील पायाभूत मार्गदर्शनाद्वारे सर्वांगीण विकास साधला जात आहे. या प्रकल्पचा चा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून कळवे ग्रामपंचायत कार्यालयात गावकर्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले.

JSW Aspire Project Dolvi, ग्रामपंचायत कळवे, विरांगना फाउंडेशन आणि अष्टविनायक मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कळवे या गावी पहिल्यांदाच विद्यार्थी व गावाकऱ्यांसाठी समुदाय वाचनालयची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे सुधीर तेलंग (JSW CSR Head), कुणाल तडस, किरण म्हात्रे (CSR Executive), भरत पाटील (VVM Foundation), डॉ. प्रगती पाटील (मॅजिक बस क्लस्टर मॅनेजर), सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, माजी सरपंच, गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी सुधीर तेलंग यांनी वाचनालयाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “समाजाचा पाठिंबा आणि सहभाग गावातील मुलांच्या व व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. देश व समाजहिताच्या कार्यात सातत्याने पाठपुरावा केल्यास निश्चितच मदत मिळते. ” त्यांनी सर्वांना शुभेच्छा देत सरपंच व अधिकाऱ्यांच्या विचारांचे कौतुक व गावकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत ,पालक व गावकरी यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत वाचनालयाचा जास्तीत जास्त लाभ घेऊ असे आश्वासन दिले.

याच वेळी वीरांगणा महिला मंडळ फाउंडेशनचे भरत पाटील यांनी न्यू इंग्लिश स्कूल जोहे मधील तीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली ज्यामध्ये एका मुलीला श्रवणयंत्र (कानाची मशीन) तसेच दोन मुलींना सायकलीचे वाटप करून शिक्षणाचा मार्ग सुकर केला . सोबतच JSW Aspire प्रकल्पाच्या मदतीने गरजू विद्यार्थ्यांची निवड करणे शक्य झाले, त्यांचे काम उत्तम व परिणामकारक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!